Share

“2029 पूर्वीच PM मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल” : संजय राऊत

संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह सुनावणीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वी राजीनामा द्यावा लागेल असा दावा केला.

Published On: 

Sanjay Raut claims PM Modi to resign before 2029

मुंबई : गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सुनावणी झाली. या विषयावर आज बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका करत एक दावाही केला आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि निवडणूक आयोगावर कडक शब्दांत टीका केली.

Sanjay Raut claims PM Modi to resign before 2029

बाळासाहेब यांचा पक्ष शाह आणि निवडणूक आयोगाने विकला, अशी तीव्र टिका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक धाडसी विधान करत त्यांनी दावा केला आहे. देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील सध्याची परिस्थिती पाहता, “पंतप्रधान मोदी यांना २०२९ पूर्वी राजीनामा द्यावा लागेल.”

संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी काश्मीरमधील परिस्थिती, मणिपूरमधील अशांतता, घसरणारे रुपयाचे मूल्य, जागतिक स्तरावर देशाची खालावलेली प्रतिमा आणि तरुणांमधील असंतोष यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी ‘टेलिप्रॉम्प्टर’शिवाय यापैकी एकाही मुद्द्यावर बोलू शकतात का?, असा सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना २०२९ पूर्वी पायउतार व्हावे लागेल आणि राजीनामा द्यावा लागेल, असे राऊत यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. अपात्र ठरलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून केलेली नियुक्ती घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आणि निवडणूक आयोगाने पक्ष विकल्याचा आरोप केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही