कधीकधी सोशल मीडियावर आपलं स्पष्ट मत मांडण्याची मोठी किंमत मोजावी लागते, हेच खरं. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर (Student Protest) झालेल्या लाठीचार्जचा निषेध करणं आता महाराष्ट्राची ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकच्या (Girija Oak) चांगलंच अंगाशी आलंय.
नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सध्या दिल्लीतलं राजकारण तापलं आहे. या आंदोलनात घुसलेल्या पोलिसांच्या लाठीचार्जचा अनेक सेलिब्रिटी तीव्र निषेध करत आहेत. मात्र, गिरीजाने आपली भूमिका मांडताच तिला सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
Girija Oak Trolled
गिरीजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सची पोलखोल केली आहे. यात तिने तिला डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये आलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स उघड केलेत. “चांगलं, वाईट आणि घाणेरडं… एका रीलमध्ये फक्त ५० फोटोच टाकता येतात, हे मला आता समजलंय,” असा उद्वेग तिने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
सोनम वांगचूक यांचं उपोषण आणि विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणारी स्टोरी तिने शेअर केली होती. त्यानंतरच ट्रोलर्सनी तिच्यावर हल्लाबोल केला. “सौंदर्यासोबत बुद्धिमत्ता असणं दुर्मिळ असतं, हे तू सिद्ध केलंस,” असा टोमणा एका युजरने मारलाय. तर काहींनी चक्क, “ही पोस्ट लिहिण्यासाठी तुला किती पैसे मिळाले?” असा सवाल विचारलाय.
“तू उत्तम काम करतेस, कृपया अशा प्रचारकी पोस्टपासून स्वत:ला दूर ठेव,” असा फुकटचा सल्लाही तिला दिला जातोय. या ट्रोलिंगमुळे अनेकांनी तिला अनफॉलो केल्याचंही समोर आलंय.
दुसरीकडे, या सगळ्या प्रकाराला न जुमानता गिरीजाने तरुणांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय. “एक असं आंदोलन आहे, ज्यावर ते लाठीचार्ज करू शकणार नाहीत,” असं म्हणत तिने तरुणांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. कॅन्डल मार्च आणि रस्त्यावरील आंदोलनाइतकंच मतदानही महत्त्वाचं असल्याचं तिने ठणकावून सांगितलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….
- ‘आपण माणसं नाही, झोंबी झालो आहोत…’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर समीर चौघुलेंचा संताप
- NEET आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्र; 26 जुलैला संयुक्त मोर्चाची घोषणा, मोदी सरकारवर जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












