Share

सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? केंद्र सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी; दिल्लीतील आंदोलनाला नवे वळण

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.

Published On: 

Sonam Wangchuk

दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषणला बसलेल्या सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, सोमवारी सकाळी वांगचुक यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी काही अटींच्या अधीन राहून उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली. केंद्र सरकार या अटी मान्य करेल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सोनम वांगचुक यांच्या तीन अटी कोणत्या आहेत?

सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी ट्विट करून बेमुदत उपोषण संपवण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन अटी (3 Conditions) ठेवल्या आहेत:

१. अलीकडील ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे आणि शिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती, यांबाबतची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे.

२. जर मला आणि ‘सीजेपी’ (CJP) प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेत जाण्याची परवानगी दिली गेली आणि तेथील खासदारांनी (MPs) नीट पेपरफुटीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर मी उपोषण मागे घेण्यास तयार आहे.

३. जर प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी संसदेत जाऊ शकलो नाही, तर खासदारांनी आणि इतर नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन वरील मुद्द्यांबाबत आश्वासन द्यावे.

मी हे सर्व सफदरजंग रुग्णालयातून सांगत आहे, जिथे मला अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्यात आले आहे. माझ्या हालचालींवर, बोलण्यावर आणि संवादावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

दिल्लीतील जंतर-मंतरवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात नेल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनाचा जोर ओसरेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र, आता खुद्द अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढला.

या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलीस हे आंदोलन मोडून काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रविवारी रात्री उशिरा जंतर-मंतर परिसरात पोलिसांची हालचाल वाढली. तिथे वॉटर कॅनन्स आणि ‘वज्र’ तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस आणि दंगल-विरोधी पथकांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. परिसरातील बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलक अत्यंत सतर्क झाले आहेत.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आज एका मोर्चाचे आयोजन करणार आहे. या मोर्चात ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली आहे. आता अभिजीत दिपके आणि जंतरमंतरवरील आंदोलक पुढील कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही