Share

लग्नाच्या दिवशी हॉटेलमध्ये राडा, टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं? वकिलांनी मागितला थेट ‘पुरावा’!

स्मृती मानधनाच्या लग्नात पलाशला मारहाण झाल्याचा दावा फेटाळत त्याच्या वकिलांनी पुराव्यांची मागणी केली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर वळणावर आहे.

Published On: 

Smriti Mandhana News : पलाशला टीम इंडियाच्या पोरींनी मारलं? वकिलांनी काढली पोलखोल

लग्नघरात सनई-चौघडे वाजत असताना अचानक काहीतरी भयानक घडतं आणि सगळंच विस्कळीत होतं, असा सीन सिनेमात आपण पाहिला असेल. पण स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या बाबतीत असंच काहीतरी घडल्याची चर्चा आता जोरात सुरू आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला हे दोघे बोहल्यावर चढणार होते, पण ऐनवेळी लग्न मोडलं. आता या प्रकरणावर स्मृतीचा मित्र विज्ञान माने याने असा ‘गौप्यस्फोट’ केला आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. विज्ञान मानेच्या दाव्यानुसार, लग्नाच्या दिवशीच पलाशला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आलं आणि संतापलेल्या टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी त्याला चोप दिला.

Smriti Mandhana-Palash Muchhal Case

पलाश मुच्छलचे वकील श्रेयांश मिथारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत थेट विज्ञान मानेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. वकिलांनी आक्रमक पवित्रा घेत विचारलं आहे की, “जर पलाशला रंगेहात पकडलं होतं, तर त्याचे पुरावे कुठे आहेत? फोटो किंवा व्हिडिओ का नाही समोर आणले?” एवढंच नाही तर, “इतके दिवस हा माणूस गप्प का होता? आताच का बोलतोय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. Smriti Mandhana-Palash Muchhal Lawyer यांच्यातील हा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे.

पलाशचे वकील आता विज्ञान माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी पैशांच्या व्यवहाराबाबतही पुराव्यांची मागणी केली आहे. “त्यामुळेच” हे प्रकरण आता फक्त आरोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नसून पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. सांगली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर स्मृती मानधनाने मात्र मौन बाळगणं पसंत केलं आहे. सोशल मीडियावरील चर्चांकडे दुर्लक्ष करत ती आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. पण विज्ञान मानेचे दावे आणि वकिलांचे प्रतिप्रश्न यामुळे चाहत्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. खरं काय आणि खोटं काय, हे आता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install