Share

‘बार डान्सरला स्टेजवर आणता…’; दीपाली सय्यदच्या ‘त्या’ वाक्याने पेटला वणवा, राधा पाटीलने काढली लायकी!

बिग बॉसच्या घरात लावणीवरून महायुद्ध पेटलं आहे. “बार डान्सर स्टेजवर आणता”, असं म्हणणाऱ्या दीपाली सय्यदवर राधा पाटील भडकली. दोघींमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल.

Published On: 

Bigg Boss Marathi 6 Fight: दीपाली सय्यद Vs राधा पाटील राडा

एका म्यानात दोन तलवारी आणि बिग बॉसच्या घरात दोन ‘नृत्यांगना’ कधीच शांत राहू शकत नाहीत, याचा प्रत्यय शो सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलाय. Bigg Boss Marathi 6 च्या घरात शांततेची अपेक्षा करणे म्हणजे वाळवंटात पाण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे. घरात एन्ट्री होताच लावणीच्या मुद्द्यावरून आता मोठा राडा (Big Fight) झाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) आणि सोशल मीडिया स्टार राधा पाटील (Radha Patil) यांच्यात शब्दांच्या तलवारी उपसल्या गेल्या आहेत.

Bigg Boss Marathi 6 Fight

घरात चर्चा सुरू असताना दीपाली सय्यद यांनी सध्याच्या लावणीच्या दर्जावर आणि सादरीकरणावर बोट ठेवलं. दीपाली म्हणाल्या, “लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे… पण तुम्ही त्याला चीप (Cheap) करून टाकलंय. बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता.” दीपाली यांचा हा थेट वार राधा पाटीलच्या जिव्हारी लागला. लावणीत होणारी भेसळ आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर दीपाली यांनी परखड मत मांडलं.

दीपालींचे हे शब्द ऐकताच राधाचा पारा चढला. तिनेही आक्रमक पवित्रा घेत दीपालीला सडेतोड उत्तर दिलं. प्रोमोमध्ये राधा स्पष्टपणे म्हणतेय, “दिपाली ताई मला लावणीवरून बोलत आहेत. मी पण लायकी काढू शकते. त्या पण डान्समध्ये होत्याच ना, तिचं कुठे नाव येतं डान्समध्ये?” एका सिनियर कलाकाराबद्दल राधाने थेट ‘लायकी’चा विषय काढल्याने घरात शांतता पसरली.

गौतमी पाटीलसोबतच्या वादाने चर्चेत आलेली राधा आणि लावणीचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या दीपाली, यांच्यातील हा वाद आता कोणत्या थराला जाणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे, राधाने घरात येतानाच “मी कोणाला घाबरत नाही,” असं सांगितलं होतं. त्यामुळे हा वाद इथेच थांबणार की त्याचे पडसाद ‘भाऊच्या धक्क्यावर’ उमटणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही