🕒 1 min read
मुंबई – राजकारणात ‘गळाभेटी’ कधी ‘गळेकापू’ ठरतील, याचा नेम नसतो. महायुतीत वरकरणी सगळं काही आलबेल दिसत असलं तरी आतून मात्र ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याचं ‘भूत’ पुन्हा एकदा बाटलीबाहेर आलं आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना असा सज्जड दम भरलाय की, महायुतीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे.
BJP Chandrashekhar Bawankule vs NCP Ajit Pawar
अजितदादांचा ‘तो’ दावा अंगलट?
पिंपरी-चिंचवडमधील एका सभेत अजित पवारांनी भाजपला जुन्या आरोपांची आठवण करून दिली होती. “माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण ज्यांनी आरोप केले आज त्यांच्यासोबतच मी सत्तेत बसलोय,” असं म्हणत त्यांनी (Ajit Pawar) भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा युक्तिवाद भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
“निकाल अजून लागलेला नाही…”
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजितदादांना कायदेशीर वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “७० हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.” हे काही अभिमानास्पद नाही, त्यामुळे यावर जास्त बोलू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
“आम्ही मागची पानं चाळली तर…”
बावनकुळे इथेच थांबले नाहीत. त्यांनी अजितदादांना थेट अल्टिमेटमच दिला आहे. “एका महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत ‘मनभेद’ निर्माण करू नका. पिंपरी-चिंचवडमध्ये तुमची अनेक वर्षे सत्ता होती. आम्ही जर मागची पानं चाळली, तर तुम्हाला बोलता येणार नाही,” असा कडक इशारा बावनकुळेंनी दिला आहे. आम्हालाही खूप काही बोलता येईल, पण ही ती वेळ नाही, असं म्हणत त्यांनी (Chandrashekhar Bawankule) भविष्यात मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत. आता या इशाऱ्यानंतर ‘दादा’ शांत बसणार की पलटवार करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “सोबत आलात तर ठीक, नाहीतर…”; आशिष शेलारांचा अजितदादांना ‘अल्टिमेटम’, युतीत मोठी ठिणगी?
- विलासरावांच्या ‘तिन्ही छाव्यांनी’ घेरलं; भाजप प्रदेशाध्यक्षांनी अखेर नमतं घेतलं! माफी मागत म्हणाले, “रितेश माझा…”
- ‘मूल जन्माला घालणं हा माझ्यासाठी सर्वात आनंदी क्षण नव्हता…’; नॅशनल क्रश गिरीजा ओकचा धक्कादायक खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












