Share

बंजारा समाजात नाराजी, धनंजय मुंडे म्हणाले, ‘मी फक्त…”; वादग्रस्त वक्तव्यावर केला मोठा खुलासा!

Dhananjay Munde clarifies ‘Vanjari-Banjara same’ statement amid controversy.

Published On: 

Why did Dhananjay Munde leave BJP in 2012

बीड, ता. १६: मराठा आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादविवादात आता बंजारा आणि वंजारी समाजातील वादामुळे आणखी भर पडली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात ‘वंजारी आणि बंजारा एकच आहेत’ असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे बंजारा समाजात तीव्र नाराजी पसरली. यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

स्थानिक पातळीवर बोलताना आणि वागताना आपण बंजारा आणि वंजारा असा उल्लेख करतो, कारण आम्ही दोघेही भटके आहोत, असे मुंडे म्हणाले. ‘वंजारी आणि बंजारा या दोन जाती सामाजिक आणि इतर बाबतीत वेगवेगळ्या आहेत, हे मला माहीत आहे. पण माझ्या भाषणात मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून बंजारा समाजाने दिलेल्या प्रेमामुळे ते बोललो,’ असा खुलासा त्यांनी केला.

Dhananjay Munde Clarifies Statement on Vanjari-Banjara

मुंडे यांनी या वादामुळे माध्यमांवरही टीका केली. ‘काही विघ्नसंतोषी लोक चांगल्या कार्यक्रमांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. टीआरपी वाढवण्यासाठी असे वाद निर्माण केले जातात,’ असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे सूचित केले.

याचवेळी, धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परळी तालुक्यातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली. ‘अतिवृष्टीमुळे शेतीचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल वाहून गेले आहेत. या कापसातून शेतकऱ्याला एक रुपयाचेही उत्पन्न मिळणार नाही,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install