Share

११,३६६ एकर वनजमिनीवर अतिक्रमण! उच्च न्यायालयाची राज्य सरकारला थेट नोटीस

Over 11,000 acres of forest land illegally occupied in Maharashtra districts.

Published On: 

Forest land encroachment in Sambhajinagar and Jalna exposed

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील तब्बल ११,३६६ एकर वनजमिनीवर झालेल्या अतिक्रमणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कडक भूमिका घेतली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल राज्य शासनासह प्रमुख वनसंरक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट नोटीस बजावण्यात आली आहे.

ही जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते जगदीश कोंडमाळे यांनी दाखल केली असून, वनजमिनीवरील बेकायदेशीर ताबा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांकडून वकील ईश्वर नरवडे पाटील, पवन साळुंके, सागर महाले पुढील युक्तिवाद करणार आहेत.

Forest land encroachment in Sambhajinagar and Jalna exposed

🔍 काय आहे नेमकं प्रकरण?

  • २०२० पर्यंत: संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील ५,६५६.६४ हेक्टर (१३,९७७.८६ एकर) जंगल क्षेत्र अतिक्रमित.
  • ३ वर्षांत फक्त: १,०२९.६० हेक्टर (२,५४४.१९ एकर) जमीनच मुक्त करण्यात आली.
  • त्यामुळे आजही ४,६०० हेक्टर (११,३६६.६८ एकर) जमिनीवर अतिक्रमण कायम.
  • वारंवार तक्रारी करूनही वनविभागाची ढिसाळ कारवाई.
  • वन्यजीव आणि पर्यावरणासाठी धोका निर्माण.

⚖️ याचिकेतून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

  1. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
  2. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण तातडीने हटवावे.
  3. मुक्त झालेल्या जमिनी पुन्हा वनजमिनीत समाविष्ट करून संरक्षित घोषित कराव्यात.
  4. भविष्यात अशा अतिक्रमणास आळा बसावा, यासाठी प्रभावी कार्यपद्धती निश्चित करावी.

कोण आहेत प्रतिवादी?

या प्रकरणात राज्य शासन, नागपूरचे प्रमुख वनसंरक्षक, छ. संभाजीनगरचे संरक्षक, उपवनसंरक्षक, तसेच सिल्लोड, सोयगाव, जालना, मंठा, अंबड, घनसावंगी, फुलंब्री, केज, परतूर येथील रेंज ऑफिसर्स यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

कोर्टाचे स्पष्ट निर्देश:

  • राज्य सरकार व वनविभागाने कालबद्ध कृती आराखडा सादर करावा.
  • अतिक्रमण हटवण्यासाठी तत्काळ आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात.
  • याचिकेतील सर्व मुद्द्यांवर पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!