Share

एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहील; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

uddhav thackeray vs devendra fadnavis | एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहील; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा 

Published On: 

uddhav thackeray vs devendra fadnavis | भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत. लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

आताही ज्या कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत.

अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे. पण आगामी दिवसांमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करा.

लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install