CM Eknath Shinde मुंबई : १८ व्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुका संपल्या असून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे (NDA)सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता येत्या काही महिन्यातच राज्यात विधानसभा ( VidhanSabha ) निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याआधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (rainy session) तारीख ठरली असून आता अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Mantrimandal Vistar) हालचालींना वेग आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रात्री अचानक दिल्लीत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप याबाबत, चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. , काहीवेळ दिल्लीत थांबल्यानंतर ते नागपूरमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी दिल्ली आणि नागपूरची वारी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.
सद्यस्थितीत राज्यात 29 मंत्री असून त्यात भाजपचे10, शिंदे गटाचे 10 आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. यामध्ये अदिती तटकरे या एकच महिला मंत्री आहेत. तसेच रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून विजयी झाल्याने ते पदही रिक्त होणार आहे. शिवाय मंत्रिमंडळात अद्याप 14 पदे रिक्त असल्याने येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप होईल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत .
या मंत्रिमंडळाच्या पार्शवभूमीवर भाजपचे नवीन प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav)आणि मंत्री आश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)प्रभारी मुंबईत येऊन विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेणार आहेत. भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाणार आहे .
तसेच लोकसभेनंतर आता देशातील महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत . त्यासाठी येत्या 25 जूनपासून निवडणूक पूर्वीची सर्व कामे सुरु होणार आहेत. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागले आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या ठिकाणी निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.त्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला आहे .
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे ४ जून पासून उपोषणाला बसणार; देवेंद्र फडणवीसांमुळे ‘ही’ वेळ आली
- भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत खैरे हसत म्हणाले…
- पत्रकारांस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










