Shrinivas Pawar : “याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्खा भाऊच अजित पवारांवर संतापला

Shrinivas Pawar VS Ajit Pawar | “वयस्कर झालेल्य माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही”, असे म्हणत अजित पवारांवर त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे चांगलेच संतापले. काटेवाडीतील ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, … Read more

Published On: 

Shrinivas Pawar VS Ajit Pawar | “वयस्कर झालेल्य माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही”, असे म्हणत अजित पवारांवर त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे चांगलेच संतापले.

काटेवाडीतील ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगला काळ असेल, वाईट काळ असू दे, नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.”

पुढे बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, “जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पदे मिळाली, ती साहेबांमुळे (शरद पवार) मिळाली. साहेबांना कीर्तन करा, घरी बसा म्हटलेलं मला काही पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत, त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही”,

“असा काका मला मिळाला असता, तर मी खुश झालो असतो…”

श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की, “साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला? ज्या साहेबांनी (शरद पवार) आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता, तर मी खुश झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवारांना संपवायचे होते. घरातील व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो.”

“घरातील माणूस घरच्यांना माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटलं नाही. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं. साहेबांनी काय केलं असतं? वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका”, असा इशारा श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना दिला.

“माझ्या वयाची माणसे लाभार्थी आहेत. तरूण पिढी म्हणते पुढचे पुढे बघू. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का? 20-25 वर्षे साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमन मला सोडत नाही. आपण खेडेगावातील माणसे आहोत. आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो, त्यांचे औषध पाणी करतो”, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही