RCB VS DC : आरसीबी पहिल्यांदाच WPL फायनलमध्ये, स्मृती मंधाना करणार विराट कोहलीचं स्वप्न पुर्ण?

RCB VS DC : महिला प्रिमीयर लिग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सेमिफायनल सामन्यात मुंबईला धूळ चारत स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाने फायनलमध्ये एंट्री केली आहे. अंतिम सामना हा १७ मार्चला अरूण जेटली स्टेडियम नवी दिल्ली येथे RCB विरुद्ध DC असा होणार आहे.

WPL 2024 चा अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली आणि आरसीबीला आत्तापर्यंत एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे अंतिम सामना रोंमांचक होणार आहे. विराट कोहलीच्या आरसीबी संघाला सुद्धा आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच २००८ पासून एकही आयपीएल ट्राॅफी मिळवता आली नाही, त्यामुळे आता WPL मध्ये स्मृती मंधाना विराट कोहलीचं ट्राॅफीच स्वप्न पूर्ण करु शकते.

आरसीबी संघाने ट्राॅफी जिंकल्यास संघाची १६ वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे. २००८ पासून आरसीबीचे फॅन्स संघाला विजेतेपद मिळावे म्हणून प्रार्थना करत आहेत.

डब्ल्यूपीएलची सुरुवात २०२३ मध्ये झाली, त्यावर्षी हरमनप्रीतच्या मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकवले. २०२३ च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीला पराभूत केले होते.

डब्ल्यूपीएलमध्ये सध्या ५ संघ खेळत असून त्यामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, राॅयल चॅलेंंजर्स बॅँगलोर, युपी वाॅरीयर्झ या संघांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.