Share

Govt Job Opportunity | पुण्यात सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 288 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी (पुरुष) पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://pmc.gov.in/landing/mar.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/106aBN1CDexCLpTbaB7wch8828No3PLYD/view

शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या पदांसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

टिग्रेटेड हेल्थ इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. 770/3, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र. 7, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे, पिनकोड- 411005

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही