Share

Sharad Pawar | शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्यांनं व्यक्त केली इच्छा

🕒 1 min readSharad Pawar | पुणे: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशा भावना राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | पुणे: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशा भावना राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

2024 पर्यंत तरी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं. जून 2025 मध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन होणार आहे. या  अधिवेशनापर्यंत शरद पवार यांनीच अध्यक्षपदावर राहावं, असं अंकुश काकडे म्हणाले आहे.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत चर्चा सुरू आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत. तर यातही सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, “मी जो काही निर्णय घेतला आहे तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला आहे. भविष्यात पक्षाचं कामकाज सुरळीत चालावं त्यातून एक नवीन नेतृत्व मजबूत करावं, हा माझा हेतू आहे. हा निर्णय घेताना मी तुम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र, ते माझ्याकडून झालं नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!