Ramdas Kadam । “शरद पवारांनी एका दगडात… “; रामदास कदम यांचं शरद पवारांच्या राजीनामानाट्यावर भाष्य

Ramdas Kadam । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती’ या त्यांच्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून देखील भाष्य केलं जात आहे. तर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

“शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले” ( Sharad Pawar On Ajit Pawar )

माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्या दृष्टीने भाजपमधील काही लोकांशी अजित पवारांची चर्चा देखील होत होती. या सर्व विषयाला उत्तरं म्हणून शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. पवार साहेबांनी राज्यातील आणि देशातील जनतेला दाखवून दिलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जनता, कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहे. तसचं त्यांनी राजीनामा देत अजित पवारांना उत्तरं देखील दिल की, हा पक्ष आजही माझा आहे तुमचा नाही, तुमच्याबरोबर कोणीच येणार नाही. वेळ आली तर तुम्हाला देखील बाजूला करू शकतो असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी युवा तरुण म्हणून रोहित पवारांचं देखील नाव चर्चेत आहे. तसचं शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यामध्ये बराच वेळ एकांतात चर्चा देखील झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांना संधी मिळणार का? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. यामुळे येत्या 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.