Sanjay Raut | “फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतायेत”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut | मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हल्ल्याची सुपारी दिल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हल्ल्याची सुपारी दिल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत.

“देवेंद्र फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतात”

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री 40 खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत त्यामुळे मला आलेल्या धमकीबद्दल आणि ‘सामना’ कार्यालयात झालेल्या पोलिसांच्या दमदाटीबद्दल मी त्यांना भेटणार नाही” असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

(Sanjay Raut said ‘Intruded into ‘match’ in my absence and threatened witness’)

“मी नाशिकला असताना माझं पोलिसांशी बोलणं झालं होतं. त्यांना मी हे सांगितलं होतं की मी नाशिकमध्ये आहे तेव्हा तुम्ही आत्ता येऊ नका. तरीही पोलीस आले आणि त्यांनी दमदाटी केली. प्रिंट केलेले कागद आधीच त्यांच्याकडे होते. त्यावर जबदस्तीने सह्या घेण्यात आल्या. मी हा सगळा प्रकार पोलीस आयुक्तांना कळवणार आहे”,  असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“सामनाच्या कार्यालयात मी नसताना घुसून जी दमदाटी केली”

“मला जी धमकी आली आहे त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना कळवलं होतं. आता पोलिसांनी ‘सामना’च्या कार्यालयात मी नसताना घुसून जी दमदाटी केली त्याबद्दल मी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिणार आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार नाही कारण ते चाळीस खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्या दबावातच ते काम करत आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“शिंदे आम्हाला म्हणाले होते पक्षाशी बेईमानी करणार नाही”- Sanjay Raut

“एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बऱ्याचवेळा चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे बंड करणार अशी कुणकुण लागल्यानंतरही चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी हे आम्हाला सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत पक्षाशी बेईमानी करणार नाही. पक्षनिष्ठा बाळगेन असं सांगितलं होतं. मात्र ते भलतंच वागले. एकनाथ शिंदे हे आमचे विश्वासू सहकारी होते. तरीही त्यांनी असं वागून दाखवलं”, असेही संजय राऊतांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदेंकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मतभेद असतात, वाद असतात तरीही शिंदे यांनी असं केलं. त्यांच्यामागे कुठल्या महाशक्तीचा दबाव त्यांच्यावर होता हे आता जगाला समजलं आहे. माझ्यावर सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत काही हरकत नाही मी घाबरत नाही” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही