Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) पूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनंतर टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. अय्यरला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळता आला नव्हता. अशात दुखापतीमुळे त्याला आशिया कप 2023 पासून दूर राहावे लागू शकते.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयसच्या (Shreyas Iyer) पाठीला दुखापत झाली होती. त्याच्या या दुखापतीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये पुनर्वसन करत आहे. अशात त्याच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Shreyas Iyer’s injuries have increased
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसच्या (Shreyas Iyer) दुखापतीमध्ये वाढ झाली आहे. एनसीएमध्ये त्याला पाठदुखीसाठी एक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या पाठीत अजून वेदना व्हायला लागल्या आहेत. अय्यरला दुखापतीमुळे वेस्टइंडीज दौऱ्यावर जाता आले नाही. आता त्याला आशिया कप 2023 ला देखील मुकावे लागू शकते.
दरम्यान, श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) फिट होण्यासाठी 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्याला आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान आशिया चषक 2023 खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pravin Darekar | “आदित्य ठाकरेंचं वय किती? त्या शेंबड्या पोरांनं…”; प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
- Sharad Pawar | अज्ञान आणि इतिहास माहीत नसल्यानं फडणवीस असं बोलतात – शरद पवार
- Sharad Pawar | अजित पवारांना पक्षप्रमुख बनवण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही – शरद पवार
- Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची घाई नको, अन्यथा…”; रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया
- PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये