५२ चेंडूंत द्विशतक! वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी पाहून रोहित शर्माचे कोच दिनेश लाड थक्क

युएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने अवघ्या ५२ चेंडूंत द्विशतक झळकावून नवा विक्रम रचला. या ऐतिहासिक खेळीनंतर रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी वैभवचे कौतुक केले आहे.

Published On: 

Vaibhav Sooryavanshi celebrating fastest double century against UAE

प्रतिनिधी, 24 नोव्हेंबर: युएईविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने २०४ धावांची वादळी खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. युएईने दिलेल्या २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने एकट्याने दुहेरी शतक झळकावले. त्याच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताने ८६ चेंडूंत हे लक्ष्य गाठत ७ गडी राखून सामना जिंकला.

वैभवने अवघ्या ५२ चेंडूंत द्विशतक पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ५२ चेंडूंत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी इतर फलंदाजांना द्विशतक पूर्ण करण्यासाठी १०० हून अधिक चेंडू लागले होते. कॅंटरबरीच्या चाड बोवसने १०३, तर तामिळनाडूच्या एन जगदीशन आणि इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने यासाठी ११४ चेंडू घेतले होते.

या विक्रमी खेळीनंतर वैभववर कौतुकाचा वर्षाव होत असून भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनीही यावर विशेष प्रतिक्रिया दिली आहे. “सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो, पण वैभव सूर्यवंशी एक अजूबा म्हणून जन्माला आला आहे,” असे दिनेश लाड म्हणाले.

दिनेश लाड यांनी वैभवच्या निर्भय वृत्तीचे कौतुक केले. ते म्हणाले की, त्यांनी वैभवला आयपीएलमध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे. तो अत्यंत निर्भयपणे (फियरलेस) खेळतो आणि बाद होण्याची त्याला कोणतीही भीती नसते. वैभवने भरपूर सराव केला असून समोर कोणता गोलंदाज आहे, याची तो पर्वा करत नाही. आत्मविश्वासाने खेळणे हाच त्याचा मोठा ‘एक्स फॅक्टर’ असल्याचे लाड यांनी नमूद केले.

“मी सचिन आणि रोहितला खेळताना पाहिले आहे, पण इतक्या लहान वयात तो ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहून मी त्याला अजूबाच म्हणतो,” अशा शब्दांत त्यांनी वैभवला दाद दिली. दरम्यान, युएईविरुद्धच्या या विजयासोबतच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून आता सेमीफायनलमध्ये त्यांच्यासमोर कोणता संघ उभा ठाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही