चेन्नई, 17 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्याचा चेन्नईसोबतचा प्रवास आता एका वेगळ्या भूमिकेतून सुरू राहणार आहे. आयपीएलच्या २०२७ च्या हंगामात धोनी संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. आता संघातील त्याची भूमिका बदलली असून, त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीचे संघातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, चेन्नईसाठी धोनीची भूमिका कायमच कळीची राहिली आहे. श्रीनिवासन म्हणाले, “धोनीशिवाय चेन्नईचा विचार होऊ शकत नाही. धोनीने जवळपास दोन दशके चेन्नईसोबत प्रवास केला. आम्ही एकत्रितपणे विकसित झालो, या प्रवासात काही धक्केही बसले.”
आयपीएलच्या २००८ मधील पहिल्या पर्वापासून धोनी चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला आहे. “धोनीला चेन्नईच्या संघात घेण्याचा आपला निर्णय सर्वोत्तम होता,” असेही श्रीनिवासन यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड केली आहे. तर, २०२६ च्या आयपीएल हंगामात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले. या नियोजनानुसारच आता महेंद्रसिंह धोनीला चेन्नईतील पूर्वीच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले असून, त्याच्यावर मेंटॉर पदाची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू, शिंदे गटाकडून ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
- IND vs NZ: आक्रमक सेलिब्रेशन भोवलं, आयसीसीकडून वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला समज
- संजय राऊत यांच्या अवमान याचिकेवर ८ डिसेंबरला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश








