प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतणार आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रोहितने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) स्वतः कळवले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेनंतर तो मुंबई संघात सामील होण्याची शक्यता आहे. या वृत्ताबाबत ‘एमसीए’च्या एका सूत्राने माहिती दिली. ते म्हणाले, “विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपण मुंबईकडून खेळणार असून, श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर मला उपलब्ध समजावे, असे त्याने आम्हाला कळवले आहे. तो नेमक्या किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल, याची माहिती नंतर देईल.”
आगामी विजय हजारे ट्रॉफीचा प्राथमिक टप्पा १४ ते २९ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल, तर बाद फेरीचे सामने २ ते ८ जानेवारी दरम्यान होणार आहेत. दुसरीकडे, भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका १३ ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे रंगणार आहे.
आंतरराष्ट्रीय सामने नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे निर्देश बीसीसीआयने दिले होते. या निर्णयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी देशांतर्गत सामने खेळले होते. रोहितनेही २०१८ नंतर प्रथमच मागील हंगामातील विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभाग नोंदवला होता.
मागील हंगामात सिक्कीमविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये रोहितने ९४ चेंडूत १५५ धावांची शानदार खेळी करत दमदार पुनरागमन केले होते. मात्र, उत्तराखंडविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दरम्यान, आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ग्लेन फिलिप्सने मोडला शाई होपचा विक्रम, भारताविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावांची नोंद
- असं पुन्हा घडणार नाही; सलमान अली आघाचा मोहसिन नक्वी आणि पीसीबीच्या निर्णयावर निशाणा
- रवींद्र जडेजाची वन-डे कारकीर्द संपली? २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत चेतेश्वर पुजाराचा मोठा खुलासा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








