हैदराबाद, 15 ऑक्टोबर: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी हैदराबाद येथे झालेला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना भारताने २४ धावांनी गमावला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर कमालीचा निराश दिसला असून त्याने गोलंदाजांवर पराभवाचे खापर फोडले आहे. लाईन आणि लेंथ न राखल्याने हा पराभव झाल्याचे सांगत त्याने एकाला नव्हे, तर संपूर्ण सहा गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरले आहे.
सामन्यानंतर बोलताना श्रेयस म्हणाला, “गोलंदाजी करताना, विशेषतः लाईन आणि लेंथच्या बाबतीत आम्ही आमच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करू शकलो नाही. २५० धावांसारख्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे कधीच सोपे नसते. सामन्यादरम्यान आम्ही प्रति षटक १२ धावांच्या वेगाने धावा करत होतो. मात्र, वेस्ट इंडिजने उत्तम गोलंदाजी केली, ज्याचे श्रेय मी त्यांना देतो. चेंडू खेळपट्टीवर येत होता आणि त्याला अधिक उसळी मिळत होती, पण त्यांच्या गोलंदाजांनी बदललेल्या परिस्थितीशी उत्तमरीत्या जुळवून घेतले.”
पुढील सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला, “पुढचा सामना खूप चुरशीचा आणि रोमांचक असेल. आमचा दृष्टिकोन तोच राहील. आगामी सामन्यात आम्हाला खूप काही वेगळे करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आम्हाला नव्या मानसिकतेने मैदानात उतरण्याची गरज आहे.” या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ३ गडी गमावून २४७ धावांचा डोंगर उभारला. डावाची सुरुवात करताना कर्णधार शाई होपने ५० चेंडूंमध्ये २०४.०० च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०२ धावांची शतकी खेळी केली.
वेस्ट इंडिजच्या इतर फलंदाजांमध्ये शेर्फेन रदरफोर्डने २६ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. याशिवाय शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत ३३, रोव्हमन पॉवेलने १७ चेंडूत २४ आणि ज्वेल अँड्र्यूजने १६ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
वेस्ट इंडिजच्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १९.३ षटकांत २२३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनने २३ चेंडूत ५६ धावांची वेगवान खेळी केली, मात्र तरीही भारताचा पराभव टळू शकला नाही. त्याच्या व्यतिरिक्त तिलक वर्माने २५ चेंडूत ४३ आणि नितीश कुमार रेड्डीने २० चेंडूत ४१ धावा केल्या. उर्वरित भारतीय फलंदाज विरोधी गोलंदाजांसमोर धावा काढण्यासाठी झगडताना दिसले. वेस्ट इंडिजकडून कीमो पॉलने सर्वाधिक पाच बळी घेतले. तसेच गुडाकेश मोतीने दोन, तर रोमॅरिओ शेफर्ड आणि शमर स्प्रिंगर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिल्ली कॅपिटल्सची ऑफर अन् युवराजचे भन्नाट उत्तर; सौरव गांगुलीच्या प्रस्तावाचा केला खुलासा
- ‘शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा’, आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
- तुकाराम मुंढेंचा धाक आहे का? MPSC कडून कागदपत्रे नष्ट करण्याच्या घाईवरून रोहित पवारांचा थेट इशारा
Quick Answers
वेस्ट इंडिजने हा सामना २४ धावांनी जिंकला. भारताचा संघ या सामन्यात २४ धावांनी पराभूत झाला.
श्रेयस अय्यरने लाईन आणि लेंथ न राखल्याने हा पराभव झाल्याचे सांगत संघातील सर्व सहा गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरले आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने ५० चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावांची शतकी खेळी केली.
वेस्ट इंडिजकडून कीमो पॉलने सर्वाधिक पाच बळी घेतले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






