प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: इलॉन मस्क यांच्याकडून एकीकडे मोदी सरकारवर निशाणा साधला जात असतानाच, त्यांच्या टेस्ला कंपनीने भारतीय बाजारासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने भारतात आपले नेटवर्क भक्कम करण्यास सुरुवात केली असून, लवकरच एक नवीन सेल्स लोकेशन सुरू करण्यात येणार आहे.
टेस्लाने ९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर (NCR) परिसरातील कंपनीचे तिसरे ‘एक्सपीरियन्स सेंटर’ नोएडा येथे सुरू केले जात आहे. नोएडाच्या सेक्टर ९८ मध्ये हे सेंटर उभारण्यात येणार असून या शहरातील हे पहिलेच टेस्ला सेंटर असेल. याआधी कंपनीची दिल्लीतील एरोसिटी आणि गुरुग्राममधील सोहना रोडवर अशी दोन एक्सपीरियन्स सेंटर्स कार्यरत आहेत. तिसरे स्टोअर सुरू करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या नव्या एक्सपीरियन्स सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ रिटेल सेवा मिळणार आहे. या ठिकाणी गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेण्याची आणि नवीन कारची ऑर्डर देण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, इथे वाहनांच्या रिपेअरिंग किंवा सर्व्हिसिंगची सुविधा दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय बाजारात नवीन मॉडेल्स लाँच केल्याचा टेस्लाला चांगला फायदा होत असून त्यांना आपला व्यवसाय अधिक मजबूत करायचा आहे.
सध्या भारतीय बाजारपेठेत टेस्लाची ‘मॉडेल वाय रिअर व्हील ड्राईव्ह’ आणि ‘मॉडेल वाय एल’ या दोन गाड्यांची विक्री होत आहे. यामध्ये ‘मॉडेल वाय’ ही ५ सीटर प्रीमियम रिअर व्हील ड्राईव्ह कार असून तिची रेंज ५०० किलोमीटर असल्याचा दावा करण्यात आला आहे. पॉवर्ड फोल्डिंग सीट्स असलेल्या या गाडीला शून्य ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठण्यासाठी ५.९ सेकंद लागतात. या मॉडेलची किंमत ५०.८९ लाख रुपये इतकी आहे.
दरम्यान, ‘मॉडेल वाय एल’ ही सहा जणांची आसनक्षमता असलेली ऑल-व्हील ड्राईव्ह एसयूव्ही (SUV) आहे. तब्बल ६८१ किलोमीटरची रेंज असणारी ही कार अवघ्या ५ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रति तासाचा वेग पकडते. या कारची किंमत ६१.९९ लाख रुपये आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये ‘ओटीए’ (OTA) अपडेट्सच्या माध्यमातून नवीन फिचर्स आणि अपग्रेड्स मिळतात. याशिवाय, यात टेस्लाचा एआय (AI) असिस्टंट ‘ग्रोक’चीही सुविधा देण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ
- राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, म्हणाले- ‘या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय!’
- पांढऱ्या शर्टच्या कॉलरवरील पिवळे डाग कसे काढायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









