प्रतिनिधी, 30 सप्टेंबर: पुण्यातील प्रसिद्ध ‘कलावंत ढोलताशा पथका’तील कलाकारांच्या वादनावर शंका उपस्थित करणाऱ्या अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) यांना आता मराठी कलाकारांनीच खडेबोल सुनावले आहेत. अभिनेत्री श्रुती (Shruti Marathe) मराठेपाठोपाठ आता अभिनेता अभिजीत केळकरनेही (Abhijeet Kelkar) जोशींच्या फेसबुक पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, “तू बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस”, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-ताशांचा मुद्दा चांगलाच गाजला. याच पार्श्वभूमीवर विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत कलाकारांच्या पथकावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ‘पुण्यातील कलाकार पथकातले कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ वादन करतात? आणि ज्या जोशाने ते रिल्समध्ये वाजवताना दिसतात, तितक्याच जोशात ते सतत वादन करतात का?’, अशी विचारणा त्यांनी केली होती.
Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post
या पोस्टवर सर्वात आधी अभिनेत्री श्रुती मराठेने सडेतोड उत्तर दिले. “बाप्पा… १.५ महिन्यांची प्रॅक्टिस ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला… तुमचे सगळे प्रश्न सुटतील, घरी बसून फेसबुकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा… जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात, ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत…” असे श्रुतीने सुनावले. यावर जोशींनी सारवासारव करत श्रुतीचे आभार मानले आणि आपण फक्त रिल्स बघितल्यामुळे हा प्रश्न पडल्याची कबुली दिली.
मात्र, हा वाद इथेच थांबला नाही. अभिनेता अभिजीत केळकरनेही जोशींच्या पोस्टवर थेट कमेंट करत संताप व्यक्त केला. “बाप्पा यातल्या एकाही कलाकाराला तू ओळखत नाहीस का? तुझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स नाहीत का? आणि पुण्यातले, मुंबईतले कलाकार म्हणजे काय असतं? तुला एवढ्या जेन्युअली हे प्रश्न पडले असते, तर त्यांच्यापैकी कोणालाही फोन करून तू हे विचारू शकला असतास किंवा प्रत्यक्ष जाऊनही पाहू शकला असतास… तू बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस. त्यातून तुला काय साध्य करायचंय, हे तुलाच माहिती पण एकंदरीतच हल्ली नेहमी उगाच निगेटिव्ह बोलतोस. आता यावर माझ्याशी बोलायला अजिबात फोन करू नकोस, मला तुझा राग आलाय…” असे अभिजीतने ठणकावून सांगितले.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत ‘कलावंत ढोलताशा पथक’ दरवर्षी सहभागी होते. २०१४ मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी एकत्र येत या पथकाची स्थापना केली होती. यामध्ये श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि सौरभ गोखले यांसारखे अनेक कलाकार दरवर्षी वादन करताना दिसतात, ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘जेव्हा रोहित खेळतो, तेव्हा माझी नजर त्याच्या पत्नीला शोधते…’; अमिताभ बच्चन यांनी सांगितला रितिकाचा रंजक किस्सा
- पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफच्या उत्तरावर तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा
- आशियाई क्रिकेट परिषदेत मोठा बदल! मोहसीन नक्वी अध्यक्षपद गमावणार, तमीम इक्बाल घेणार जागा
Quick Answers
पुण्यातील कलाकार पथकातले कलाकार विसर्जन मिरवणुकीत एकूण किती वेळ वादन करतात आणि ते रिल्समध्ये दिसतात तितक्याच जोशात सतत वादन करतात का, अशी विचारणा विद्याधर जोशी यांनी केली होती.
श्रुती मराठेने सांगितले की, ते दीड महिन्यांची प्रॅक्टिस, ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक करतात. तसेच शंका असल्यास पुढच्या वर्षी एक दिवस तरी बघायला यावे, घरी बसून फेसबुकवर टाकून उत्तरे मिळत नाहीत, असे तिने सुनावले.
अभिजीत केळकरने म्हटले की, जोशी कलाकारांना ओळखत असूनही फोनवर विचारू शकले असते किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहू शकले असते. 'तू बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस' आणि हल्ली उगाच निगेटिव्ह बोलतोस, असे म्हणत त्याने राग व्यक्त केला.
२०१४ मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी एकत्र येत ‘कलावंत ढोलताशा पथका’ची स्थापना केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









