मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी दौरा सुरू केला आहे. सोलापूरच्या दौऱ्यानंतर विविध जिल्ह्यांतून प्रवास करत असताना एक घटना घडली. मनोज जरांगे यांच्या ताफ्याला भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
ताफ्यातील वाहने अचानक एकमेकांवर आदळली आणि त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या एसटी बसने (ST Bus) एका वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक ‘अर्टिगा’ कार (Ertiga Car) पूर्णपणे चक्काचूर झाली आणि एक मराठा कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला. त्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे यांनी स्वत: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Manoj Jarange convoy accident with ST bus
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून प्रवास करत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांनी अचानक ब्रेक लावले. यामुळे ताफ्याच्या मागील बाजूस असलेली वाहने एकमेकांवर आदळली.
याच दरम्यान, मागून वेगाने येणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट ‘अर्टिगा’ कारवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, त्या कारचा पुढचा आणि मागचा दोन्ही भाग पूर्णपणे चेपले गेले.
कार्यकर्ता जखमी; जरांगे पाटील सुरक्षित
अपघाताचा आवाज ऐकताच ताफ्यातील इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी तातडीने धावून आले. गाडीत अडकलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने, मनोज जरांगे पाटील पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्या वाहनाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर केली आणि या घटनेचा तपास सुरू केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘विद्यार्थ्यांना शत्रूसारखे मारले’; झारखंड आंदोलनावर आशिष शेलारांचे मोठे विधान
- नवी मुंबईत ‘क्लस्टर’वरून राजकीय रणकंदन; भाजप म्हणाले, ‘एक वीटही रचू देणार नाही’
- मुंबईत राजकीय सस्पेन्स वाढला; ‘हा’ सदस्य अजून ठाकरे गटातच… मग शिंदे गटाच्या बैठकीत कसा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












