Share

आसाममध्ये हाहाकार! ७६३ गावं पाण्याखाली, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान, नेमकं काय करतोय?

आसाममधील महापुरात अडकलेल्या ५ लाखांहून अधिक लोकांसाठी अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला असून, अन्न आणि सॅनिटरी पॅड्सचं वाटप सुरू केलं आहे.

Published On: 

Salman Khan helping Assam flood victims through Being Human

एका बाजूला ७६३ पेक्षा जास्त गावं पाण्याखाली गेली आहेत, तर दुसरीकडे ५ लाख २४ हजारांहून अधिक लोकांचा जीव टांगणीला लागलाय. आसाममधील या भयंकर पुराच्या हाहाकारात मदतीचा हात कुणी द्यायचा, हा प्रश्न असतानाच आता थेट बॉलिवूडचा ‘भाईजान’ मैदानात उतरला आहे.

आसाममध्ये सध्या पुरामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत ६८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अशा या अस्मानी संकटात अडकलेल्या लोकांसाठी अभिनेता सलमान खान (Salman Khan) देवदूत ठरला आहे. त्याने आपली संस्था ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) आणि आसाममधील एका फॅन क्लबच्या मदतीने पूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे.

Salman Khan Helps Assam 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या टीमने थेट ग्राउंड लेव्हलवर काम सुरू केलं आहे. पूरग्रस्तांना बिस्किटे, गूळ, चुरमुरे आणि ब्रेड यांसारख्या ‘रेडी-टू-ईट’ पदार्थांचं वाटप केलं जातंय. विशेष म्हणजे, अशा कठीण परिस्थितीत महिलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना सॅनिटरी पॅड्सही पुरवले जात आहेत.

सलमान खानने अशा प्रकारे संकटकाळात मदतीचा हात पुढे करण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी पंजाबमध्ये आलेल्या महापुरातही त्याने गरिबांना आणि शेतकऱ्यांना अशीच मोठी मदत केली होती.

दुसरीकडे, सलमान पाठोपाठ आता इतर कलाकारही आसामच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आसामी गायक पापन याने नुकतंच विशाल ददलानी, दिव्या कुमार आणि निलोत्पल बोरा यांच्यासोबत मिळून इन्स्टाग्रामवर एक ‘लाइव्ह चॅरिटी कॉन्सर्ट’ घेतलं.

या माध्यमातून पुरामुळे बाधित झालेल्या लाखो लोकांसाठी निधी उभारण्याचं काम सुरू आहे. संकट कितीही मोठं असलं तरी माणुसकीच्या नात्याने सेलिब्रिटी आणि संस्था ज्या प्रकारे एकत्र येत आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही