Share

सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’ सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे आणि मुलाखती बंद

घशात सूज आढळल्याने डॉक्टरांनी सुप्रिया सुळे यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.

Published On: 

Supriya Sule

🕒 1 min read

नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि लोकसभेत हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन देण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशातील सूजेमुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. परिणामी, त्या पुढील एक ते दोन आठवडे भाषणे करणार नाहीत किंवा मुलाखतीही देणार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील प्रमुख नेत्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना घशाचा त्रास होत असल्याने, पक्षाची भूमिका मांडण्याची मुख्य जबाबदारी आता इतरांवर येऊ शकते.

सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात की, “मी नुकताच माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्यांबाबत डॉ. मिलिंद कीर्तने यांचा सल्ला घेतला. त्यांनी घशात सौम्य सूज असल्याचे निदान केले आहे. मला पूर्ण ‘व्हॉइस रेस्ट’ घेण्याचा सल्ला दिला आहे. उपचाराचा भाग म्हणून मी ‘व्हॉइस थेरपी’ घेणार आहे आणि मला पुढील १-२ आठवडे भाषणे, मुलाखती व जास्त वेळ बोलणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही