Share

अमित शहा-एकनाथ शिंदे यांची 45 मिनिटांची बैठक; 6 खासदारांना मोठे आश्वासन, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या 45 मिनिटांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या विकासकामांवर चर्चा केली असून, सहा खासदारांना निधीबाबत आश्वासन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Published On: 

Shine Meets Shah

🕒 1 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या बैठकीला शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासह, शिंदे गटात सामील झालेले सहा खासदार उपस्थित होते. अमित शहा आणि शिंदे यांच्यातील ही बैठक ४५ मिनिटे चालली. बंद दाराआड विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. चर्चेतील नेमके विषय उघड करण्यात आले नसले तरी, या सहा खासदारांना अमित शहा यांच्याकडून महत्त्वपूर्ण आश्वासने मिळाल्याचे वृत्त आहे.

दिल्लीतील बैठकीत नेमके काय घडले?

केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होण्याची शक्यता आहे. या विस्तारात खासदार श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच, शिवसेनेला राज्यमंत्रीपदाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो.” त्यांनी सांगितले की, खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबतचे प्रस्ताव आणि पत्रे त्यांनी शहा यांना सादर केली. तसेच, नवीन आणि विद्यमान खासदारांशी योग्य समन्वय राखण्याचा सल्ला शहा यांनी श्रीकांत शिंदे यांना दिल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

अमित शहा यांनी नेमके काय आश्वासन दिले?

दरम्यान, ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील विकासकामांबाबतच्या मागण्या मांडल्याचे समजते. अमित शहा यांनी त्यांना निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन दिले आणि निश्चिंत राहा, असे सांगितले. आता ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये नेमके काय बदल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही