Share

IND vs IRE 2nd T20: वैभव सूर्यवंशीला डावललं! शेवटच्या क्षणी टीम इंडियात दोन नव्या चेहऱ्यांची एंट्री

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची चर्चा असताना भारताने प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली.

Published On: 

IND vs IRE 2nd T20: वैभव सूर्यवंशीला डावललं! शेवटच्या क्षणी टीम इंडियात दोन नव्या चेहऱ्यांची एंट्री

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यापूर्वी सर्वाधिक चर्चा होती ती युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) पदार्पणाची. चाहते त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र सामन्याच्या काही मिनिटांपूर्वीच टीम इंडियाने (India Team) सर्वांना आश्चर्याचा धक्का देत दोन नव्या खेळाडूंना संधी दिली.

श्रेयस अय्यरचा अनपेक्षित निर्णय

बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हन जाहीर करताना भारताकडून दोन युवा खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधीच दोघांना पदार्पणाची कॅप देण्यात आली.

वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना प्रतीक्षा

वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची मोठी अपेक्षा असताना त्याला दुसऱ्या टी-20 सामन्यातही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळाली. मात्र संघ व्यवस्थापन वैभवला मोठ्या मंचावर उतरवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झाल्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला मालिका बरोबरीत आणण्याचे आव्हान आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर आयर्लंडला ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन:

टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही