Share

Raj Thackeray | अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाही; काका बाजूला तर काय होईल?- राज ठाकरे

Raj Thackeray | मुंबई: ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) करणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये कलाकारांसह अनेक राजकीय नेते दिसणार आहेत. या शोचे काही प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहे. … Read more

Published On: 

Raj Thackeray | मुंबई: ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) करणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये कलाकारांसह अनेक राजकीय नेते दिसणार आहेत. या शोचे काही प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहे. राज ठाकरे यांच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरेंनी अजित पवारांवर घणाघात केल्याचं दिसून आलं आहे.

Raj Thackeray criticizes Ajit Pawar

झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) अजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसले आहे. “अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही. बारामतीमधील काकांनी हात बाजूला केला, तर अजित पवारांचं काय होईल?”, असा खोचक टोला राज ठाकरे अजित पवारांना लगावला आहे.

या प्रोमोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) अजित पवारांची मिमिक्री करताना देखील दिसले आहे. अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरे “ए गप रे… असं मी म्हणणार होतो,” असं उत्तर देतात.

दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ शोचा हा नवा प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 4 जून पासून दर रविवारी रात्री 9 वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install