IPL 2024 नंतर धोनीसह ‘हे’ 10 दिग्गज क्रिकेटला रामराम ठोकणार

Mahendra Singh Dhoni Retire after ipl 2024

 IPL 2024 । आयपीएल २०२४ साठीचा लिलाव दुबई येथे पार पडला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक सत्रांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली जात आहे. दुबईत झालेल्या मिनी लिलावानंतर महेंद्रसिंग धोनी या हंगामानंतर निवृत्ती जाहीर करणार का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे.

आयपीएल 2024 नंतर महेंद्रसिंह धोनीसह ९ दिग्गज खेळाडू क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा आहे. ज्यामध्ये पहिले नाव महेंद्रसिंह धोनीचे आहे.

महेंद्रसिंह धोनी । Mahendra Singh Dhoni 

चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत या संघाने सर्वाधिक ५ वेळा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. हे सर्व विजय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मिळाले आहेत.

रविचंद्रन अश्विन | Ravichandran Ashwin

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन 37 वर्षांचा आहे. IPL 2024 साठी राजस्थान रॉयल्सने त्याला कायम ठेवले आहे.

डेव्हिड वॉर्नर | David Warner

ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे, जो गेली अनेक वर्षे आयपीएल खेळत आहे आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. डेव्हिड वॉर्नर देखील 37 वर्षांचा आहे.

फाफ डु प्लेसिस | Faf du Plessis

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु-प्लेसिस  गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. फाफ 39 वर्षांचा आहे. आरसीबीने IPL 2024 साठी फॅफचा कर्णधार म्हणून संघात समावेश केला आहे आणि फॅफच्या फिटनेस आणि फॉर्ममध्ये कोणतीही घसरण झालेली नाही, परंतु त्याचे वय पाहता, आयपीएल 2024 हा त्याच्यासाठीही शेवटचा हंगाम ठरू शकतो.

दिनेश कार्तिक | Dinesh Karthik 

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक  38 वर्षांचा आहे. IPL 2024 साठी आरसीबीने त्याला कायम ठेवले आहे.

शिखर धवन | Shikhar Dhawan

38 वर्षांचा शिखर धवन आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

इशांत शर्मा | Ishant Sharma 

35 वर्षीय इशांत शर्मा क्रिकेटपासून दूर आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आयपीएलमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. इशांत IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्स संघात आहे.

वृद्धीमान साहा | Wriddhiman Saha

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाचे वय ३९ वर्षे आहे. IPL 2024 साठी गुजरात टायटन्सने साहाला कायम ठेवले आहे.

अमित मिश्रा । Amit Mishra

अमित मिश्राचे वय ४१ वर्षे आहे. तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे, परंतु IPL 2024 हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.

मोहम्मद नबी | Mohammad Nabi

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद नबीचाही समावेश आहे, जो 1 जानेवारी 2024 रोजी 39 वर्षांचा होईल. IPL 2024 च्या लिलावात या खेळाडूला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे.

हे वाचा –

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.