कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर प्रेक्षकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६:३० वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी (Toss) मैदानावर येतील. नाणेफेकीचा कौल या सामन्यात अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
SA vs NZ Live: टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीचा महाथरार!
SA vs NZ Live : अटीतटीच्या सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात
South Africa vs New Zealand Semi Final
आता अवघ्या काही तासांतच या हाय-व्होल्टेज सामन्याची नाणेफेक होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टारवर South Africa vs New Zealand Semi Final चं थेट प्रक्षेपण पाहता येईल. मैदानावरच्या प्रत्येक ताज्या घडामोडीसाठी आणि इनसाईड अपडेट्ससाठी इथेच जोडलेले राहा!
SA vs NZ Live : आफ्रिका 'चोकर्स'चा टॅग पुसणार की न्यूझीलंड बाजी मारणार?
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकेने न्यूझीलंडला तब्बल ५ वेळा धूळ चारली आहे, त्यांच्याकडून एकदाही पराभव पत्करलेला नाही. पण बाद फेरीत (Knockout) खेळताना आफ्रिका नेहमीच दबावाखाली येते, हा जुना इतिहास आहे. आज मार्करमची सेना हा ‘चोकर्स’चा कलंक पुसून थेट फायनलमध्ये धडक मारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
SA vs NZ Live : कोलकात्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
क्रिकेट चाहत्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे! आज ईडन गार्डन्सवर पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. आकाश निरभ्र असेल. त्यामुळे आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील हा हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीचा सामना विनाअडथळा पूर्ण ४० षटकांचा पाहायला मिळेल.
SA vs NZ Live : ईडन गार्डन्सची खेळपट्टी कोणाला साथ देणार?
कोलकात्याची खेळपट्टी टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. इथे आज चौकार-षटकारांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पण सर्वांत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे रात्री पडणारं दव (Dew). त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ डोळे झाकून प्रथम गोलंदाजी (चेस) करण्याचाच निर्णय घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
SA vs NZ Live: कोण मारणार बाजी?
दक्षिण आफ्रिकेचा विचार केल्यास ते आज पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील. SA vs NZ Live सामन्यात आफ्रिकेची फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. कर्णधार एडन मार्करम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला क्विंटन डी कॉक आणि डेवाल्ड ब्रेविससारख्या आक्रमक फलंदाजांची उत्तम साथ मिळेल. गोलंदाजीत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीवर मोठी मदार असणार आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये धक्कादायक निकाल देण्यासाठी ओळखला जातो. SA vs NZ Live सामन्यात किवी संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आज संघात परतण्याची दाट शक्यता आहे. फलंदाजीत टिम सेफर्ट आणि रचिन रवींद्र यांच्यावर संघाची मोठी भिस्त असेल.
SA vs NZ Live : न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग ११
टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची (किंवा जिमी नीशम), मॅट हेन्री, ईश सोढी आणि लॉकी फर्ग्युसन. किवींचा हा संतुलित संघ आज आफ्रिकेला नक्कीच कडवी झुंज देईल.
SA vs NZ Live मॅचसाठी आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग ११ अशी असू शकते
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, एडन मार्करम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी. हा संघ कोणत्याही गोलंदाजी फळीला घाम फोडण्यासाठी पुरेसा ताकदवान मानला जातोय.
SA vs NZ Live: ईडन गार्डन्सची खेळपट्टी
SA vs NZ Live: कोलकात्याच्या या मैदानावर या विश्वचषकात आधीच २०० पेक्षा जास्त धावांचे सामने झाले आहेत. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उत्तम मानली जाते आणि रात्री दव पडण्याची शक्यता असल्यामुळे नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करणं (चेस करणं) इथं फायद्याचं ठरू शकतं.
SA vs NZ Live: पावसाचा नियम (Reserve Day Rules)
SA vs NZ Live: आयसीसीच्या नियमानुसार, जर पाऊस किंवा इतर कारणांमुळे आज आणि उद्या (रिझर्व्ह डे) दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही, तर ‘सुपर ८’ फेरीच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असलेला संघ पुढे जातो. आफ्रिकेने त्यांच्या ग्रुप १ मध्ये टॉप केलं होतं, त्यामुळे सामना रद्द झाल्यास आफ्रिका थेट फायनलमध्ये जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड आणि 'चोकर्स' टॅग
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकेने न्यूझीलंडला ५ वेळा हरवलंय, एकही सामना गमावलेला नाही. पण नॉकआउट मॅचेसमध्ये आफ्रिकेचा रेकॉर्ड अत्यंत खराब (१ विजय, ३ पराभव) आहे. त्यामुळे आज ते ‘चोकर्स’चा टॅग पुसणार की इतिहास पुन्हा गिरवणार, यावर प्रेक्षकांचं लक्ष आहे.