Arvind Sawant | लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत म्हणाले, “माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे…”
Arvind Sawant | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. मोदी मुंबईत येणार असल्याने भाजप-शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देताना त्यावर नाव न टाकल्याने अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी संताप व्यक्त केला आहे
ते म्हणाले, “काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. यापत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांच नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझं नाव नाही.”
“काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहीलं नव्हत. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आलं आहे”, असा टोला अरविंद सावंत यांनी भाजपला लगावला आहे.
हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, “आज फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. ‘खोटं बोला पण रेटून बोला’ यामध्ये माहीर असेलल्या भाजपाचा हा उपक्रम आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Chhota Rajan | छोटा राजनचा भाऊ सर्वच निवडणुका लढवणार?; आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
- Shah Rukh Khan | बिकिनीच्या वादावर शाहरुख म्हणाला, “बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिकासारखं कोणी..”
- कृषी क्षेत्र – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याठी व्यावहारिक पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची गरज
- Eknath Shinde | “मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, आज तेच…”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- UPSC Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! UPSC च्या ‘या’ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू