Kirit Somaiyya | सोमय्यांचा मोठा झटका; संजय राऊतांच्या ‘या’ निकटवर्तीयांवर कारवाई होण्याची शक्यता

Kirit Somaiyya |  मुंबई : भाजप नेतेचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला जातो आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजीत पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इटर्नल हेल्थकेअर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई महापालिकेचे कोरोना काळात वेगवेगळे टेंडर निघत होते. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी याआधी देखील एका कंपनीच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी इटर्नल हेल्थकेअर कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे संबंधित कंपनीच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.