Uddhav Thackeray | शिंदेंचे आमदार ठाकरे गटात परतणार; ठाकरे गटाचा दावा

Uddhav Thackeray | मुंबई: 02 जुलै रोजी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. तर शिंदेंचे काही आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

MLA of Shinde group is in touch with Thackeray group – Vinayak Raut

शिंदे गटाचे 08 ते 10 आमदार ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याचं विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे. विनायक राऊत म्हणाले, “मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटातील काही आमदारांच्या संपर्कात आहे. मंत्रीपदावर जे आमदार डोळा ठेवून बसले होते, त्यातील बहुतांश आमदार आमच्या संपर्कात आहे. मंत्रीपद जाणार असल्याची भीती काही आमदारांमध्ये निर्माण झाली आहे, ते देखील आमच्या संपर्कात आहे.

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “ज्या मंत्र्यांनी मंत्रिपदासाठी कपडे शिवले होते, त्यातील अनेकांना कळलं आहे की त्यांची वर्णी लागणार नाही. शिंदे गटाला फक्त दोन मंत्रिपद मिळणार आहे. म्हणून काल शिंदे गटात मोठा वाद झाला आहे.”

या सर्व प्रकरणावर सुधीर सूर्यवंशी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत सुधीर सूर्यवंशी म्हणाले, “विद्यमान सरकारमध्ये अजित पवारांनी प्रवेश केल्यानंतर शिंदे गटातील आमदार ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता आहे. आम्ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात एकही शब्द उच्चारला नसल्याचं म्हणतं हे आमदार पुन्हा ठाकरे गटात सामील होणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.