Naresh Mhaske | “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झालीय”

Naresh Mhaske | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झाली आहे. आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले आहेत किंवा किती सेटलमेंट कराव्या लागल्या आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशी जहरी टीका नरेश म्हस्के यांनी केलीय.

तेथील पदाधिकारी नाराज होऊ नये, म्हणून त्यांना मतदारसंघात महापौर करावं लागलं असल्याचा दावा त्यांनी केला. तुम्ही वरळी मतदारसंघच का निवडला? आपण जिथे राहता तेथून निवडणुकीसाठी उभे का राहिला नाहीत? कारण तुम्ही पडले असता, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

“शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी आदित्य ठाकरेंची स्थिती झाली आहे. कारण त्यांच्यामागे कुणी नाहीये. तो जेलर ज्या पद्धतीने बरळत असतो. त्याप्रमाणे आदित्य ठाकरे बरळत आहेत. त्यांच्या बालिश आव्हानाकडे आम्ही दुर्लक्ष करतो,” असं नरेश म्हस्के म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

“मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :