Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंना निलंबित करा; हायकमांडच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सूचना

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक (Nashik Graduate Constituency Election) पदवीधर निवडणुकीबाबतच्या घडामोडी वारंवार बदलत असताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचा आदेश मोडल्यामुळे सुरुवातीला डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं आता काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या चांगलच अंगलट येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ‘सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा’, अशा सूचनाच काँग्रेस (INC) हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दिल्या आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे.

रविवारी सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच राजकीय वातावरणात बदलाला सुरवात झाली.

दरम्यान, राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये काँग्रेसची नाचक्की झाली. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. त्यातच आता दिल्ली हायकमांडकडे कारवाईची सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दिली आहे. दोनच दिवसात सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. आता सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.