Sanjay Raut | “माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वाद  सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हल्ल्याचा कट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत.

“माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती मी पोलीस आयुक्तांना दिली असताना, या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचं काम पोलीस करत आहेत”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बुधवारी संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ल्याची सुपारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. यासंबंधीची पक्की माहिती मला मिळाली आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर पोलीसांनी संजय राऊत यांचा जबाब नोंदवला. तसेच सामना वृत्तपत्राच्या कार्यालयातील व्यक्तींचाही जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

“माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”-Sanjay Raut

“सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात मी नसताना तपासाच्या नावाखाली पोलीस घुसले. त्यांनी साक्षीदारांना धमकावलं. आधीच प्रिंट करून आणलेल्या मजकूरावर साक्षीदारांच्या सह्या घेतल्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रचंड दबाव आहे. या मालिकेत आता आणखी काय काय घडतंय, हे पाहा”, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

“हे गुंडांचं, खोकेवाल्यांचं सरकार” (Sanjay Raut criticize On state Government)

“हे गुंडांचं सरकार आहे. खोकेवाल्यांचं सरकार आहे. साक्षीदारावर दबाव आहे. माझ्या माघारी सामना कार्यालयात जाऊन साक्षीदाराला धमकी देण्याची चर्चा सुरु होती. हे होणारच. एक गुंड खुलेआम मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभे राहून धमकी देतो. त्यांच्या बंगल्यावरही जातो. त्यांच्या खासदार पुत्रासोबत दिसतो. त्याला पोलीसाचंही समर्थन मिळतं. पोलीस त्याला संरक्षण देतात. ही कोणती कायदा व्यवस्था आहे. मी माहिती दिली आहे. माझ्याकडेही जबाबासाठी आले होते. मी सामनात नसताना अनेकांना धमकी दिली. जबाबासाठी दबाव आणला. तुम्ही हे सगळं पाहत आहात”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.