Asia Cup 2023 | हाँगकाँग: भारतीय महिला अ क्रिकेट संघानं महिला इमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेत विजय मिळवला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशला पराभूत करून जेतेपदावर आपलं नाव कोरल आहे. भारतीय महिला संघानं हा सामना 31 धावांनी जिंकला आहे.
Bangladesh Women A team needed 128 runs to win Asia Cup 2023
इमर्जिंग आशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने 07 गडी बाद 127 धावा केल्या. बांगलादेश महिला अ संघाला हा सामना जिंकण्यासाठी 128 धावांची गरज होती. मात्र, भारतीय महिला अ संघाने बांगलादेशचा डाव 96 धावांमध्ये उरकला. भारताने बांगलादेश संघाला 19.2 षटकात 96 धावा देत सर्वबाद केले.
या अंतिम सामन्यात (Asia Cup 2023) टीम इंडियाच्या श्रेयंका पाटीलने उत्कृष्ट गोलंदाजी केली. श्रेयंकाने 4 षटकांत 13 धावा देत 4 गडी बाद केले. त्याचबरोबर कनिका अहुजा आणि मन्नत कश्यपने अनुक्रमे 2 आणि 3 गडी बाद केले.
दरम्यान, या स्पर्धेच्या (Asia Cup 2023) सेमी फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका संघ आमने-सामने येणार होते. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला. या स्पर्धेच्या लीग टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी असल्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली.
महत्वाच्या बातम्या
- Gulabrao Patil | गद्दारी करायची असती तर राज ठाकरे आणि राणेंसोबतच गेलो असतो – गुलाबराव पाटील
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी ED ची छापेमारी
- Amol Kolhe | ठाकरेंना गोलीगत धोका मिळणार; महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार – अमोल कोल्हे
- Vande Bharat Sleeper | रेल्वे प्रवास होणार आणखी आरामदायी! लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
- Devendra Fadnavis | “ज्या लोकांचे घोटाळ्यांत कनेक्शन असेल त्यांना…”; BMC कोविड घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा