Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी ED ची छापेमारी

Aditya Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणावर ईडी कारवाई करत आहे. या घोटाळ्या  प्रकरणी ईडीनं आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरी धाड टाकली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही छापेमारी केली आहे.

Suraj Chavan has been interrogated by 5 officers of ED

सुरज चव्हाण चेंबूरमधील के के ग्रँड या इमारतीत अकराव्या मजल्यावर राहतात. या ठिकाणी ईडीनं धाड टाकलेली असून ईडीच्या 5 अधिकाऱ्यांनी सुरज चव्हाण यांची चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान ठाकरे गटाच्या (Aditya Thackeray) कार्यकर्त्यांनी इमारती बाहेर गर्दी करत ईडीचा विरोध केला.

कोविड काळामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसने केलेल्या घोटाळ्यावरून ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू होती. मात्र, आता ईडीनं या प्रकरणामध्ये उडी (Aditya Thackeray) घेतली आहे. याप्रकरणी ईडीनं एकूण 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

दरम्यान, सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सूरज  चव्हाण यांच्या घरी झालेल्या छापीमारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.