Vande Bharat Sleeper | रेल्वे प्रवास होणार आणखी आरामदायी! लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper | नवी दिल्ली: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशामध्ये लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. या ट्रेनमुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमुळे तुमचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असेल.

द इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई याठिकाणी वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper) ट्रेनच्या डिझाईनचे काम सुरू आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं. मार्च 2024 पर्यंत ही ट्रेन पूर्णपणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर एका महिन्यात ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत हजर होईल.

Vande Bharat sleeper train will have many modern facilities

वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper) ट्रेनमध्ये बऱ्याच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये प्रवाशांना वाय-फाय देखील मिळेल. त्याचबरोबर प्रवाशांना स्थानक आणि इतर माहितीची अपडेट देण्यासाठी यामध्ये एलईडी स्कीन लावण्यात येणार आहे. आरामदायिक प्रवास आणि सुरक्षा यासाठी देखील या ट्रेनमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, प्रवाशांना आधुनिक सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने वंदे भारत रेल्वे सुरू केली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल 2024 यादरम्यान प्रवाशांसाठी वंदे चेअर कार (Vande Chair Car), वंदे मेट्रो (Vande Metro) आणि वंदे स्लीपर (Vande Bharat Sleeper) उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.