Team India | आयर्लंड दौऱ्यावर BCCI देणार 05 सलामीवीरांना संधी?

Team India | टीम महाराष्ट्र देशा: पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया आतापासूनच तयारीला लागली आहे. भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 मालिका (T-20 series) खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना वगळून युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये बीसीसीआय 05 सलामीवीरांना (Team India) संधी देऊ शकते. यामध्ये इशान किशन (Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad), शुभमन गिल (Shubman Gill), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या सलामीवीरांचा समावेश असू शकतो.

Ishan Kishan has played 27 T20 matches for India so far

इशान किशनने भारतासाठी (Team India) आतापर्यंत 27 टी-20 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 04 अर्धशतक ठोकत 653 धावा केल्या आहेत. तर ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत टीम इंडियासाठी 09 टी-20 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 135 धावा केल्या आहेत.

आयर्लंड दौऱ्यावर संजू सॅमसनलाही संधी दिली जाऊ शकते. भारतासाठी (Team India) त्याने आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने तब्बल 301 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे यशस्वी जयस्वालला आयर्लंड दौऱ्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 625 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या