Devendra Fadnavis | “ज्या लोकांचे घोटाळ्यांत कनेक्शन असेल त्यांना…”; BMC कोविड घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या जवळचे समजले जाणारे सुरत चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाडी टाकली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणावरून ईडी ही कारवाई करत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुभव नसलेल्या कंपन्या अचानक तयार झाल्या आहेत. त्याचबरोबर लोकांच्या जीवाशी खेळण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. नेमका हा प्रकार काय आहे, हे आम्हालाही माहीत नाही.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “या प्रकरणांमध्ये ज्या ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्याकडे छापीमारी सुरू आहे. या छाप्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे ईडी सांगू शकेल. या विषयाबद्दल माझ्याकडे जास्त माहिती नाही.”

People’s representatives should manage their anger – Devendra Fadnavis

“एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप राग येऊ शकतो. मात्र, लोकप्रतिनिधींनी हा राग सांभाळायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी शांत राहून कायद्याच्या चौकटीत काम करायला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार गीता जैन यांनी केलेल्या कृत्यावर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.