Sharad Pawar | न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं – शरद पवार

Sharad Pawar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज शरद पवार नाशिकमध्ये पहिल्यांदा जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, असं शरद पवार म्हणाले.

तुमचं वय आता 83 झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही? असं अजित पवार शरद पवारांना म्हणाले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) उत्तर दिलं आहे. शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान असताना मोरारजी देसाई यांचं वय 84 होतं. तरी ते खूप काम करायचे. त्याचबरोबर आत्ताच्या मंत्रिमंडळात 70 च्या वर वय असलेले अनेक मंत्री आहेत. त्यामुळं न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं.”

Amol Kolhe have been successful in the field of art – Sharad Pawar

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “अमोल कोल्हे (Amol Kolhe ) कला क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यानंतर ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा आग्रह मीचं त्यांना केला होता. त्यांनी तो स्वीकारला आणि त्यानंतर ते प्रचंड मतांनी विजयी झाले.”

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची विठ्ठलाशी तुलना केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “विठ्ठल हे राज्यातील जनसामान्यांचं श्रद्धास्थान आहे. सामान्य जनता उन्हातान्हात जाऊन विठ्ठलाचं किंवा त्याच्या कळसाचं दर्शन घेतात. त्यामुळं अशा पद्धतीची तुलना करणं योग्य नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.