मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का? Eknath Shinde यांनी स्पष्टच सांगितले…

Eknath Shinde | मुंबई | 18 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

“मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणी नुसार मागे घेण्यात येत आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता रोकोवरुन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटीनाईज सुरु आहे.

सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे. त्यामुळे त्याची छाननी सुरु आहेत, ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्यांचं वर्गीरकरण केलं जाईल. जे गंभीर गुन्हे आहेत, ज्यात जीवितहानी, वित्तहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालं आहे, त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसवून सकारात्मक मार्ग काढणार आहोत. छोटे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने अगोदर घेतला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“आपण मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली. मराठा आरक्षण 10 टक्के देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं. या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे.

पोलीस भरती सुरु आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा होईल. कोर्टात काही लोकं गेली होती. पण कोर्टाने मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारची स्थगिती आणली नाही. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट फाईल करुन ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलं आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde LIVE PRESS

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.