WPL मध्ये RCB वर पैशांचा वर्षाव; मराठमोळ्या स्मृती मंधानाने जिंकली मने

RCB WPL  2024 | आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत ट्राॅफी आपल्या नावावर केली आहे. दिल्लीचा अंतिम सामन्यातील हा सलग दूसरा पराभव आहे तर आरसीबी संघाचा आयपीएल आणि डब्लूपीएल इतिहासातील पहिलाच विजय आहे. या विजयासोबतच आरसीबीने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सुद्धा मिळवली आहे, त्यामुळे संघावर पैशांचा पाऊस होताना दिसत आहे.

आरसीबीच्या एलिस पेरीने या हंगामातील ऑरेंज कॅप जिंकली आहे. तीने WPL 2024 मध्ये ३४७ धावा केल्या आहेत. याशिवाय आरसीबीच्या श्रेयंका पाटीलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी करत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तीला पर्पल कॅप मिळाली आहे. तीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. इमर्जिंग खेळाडूचा पुरस्कारही श्रेयंकाच्या खात्यात आला आहे.

आरसीबी संघ विजेता ठरल्यामुळे संघाला ६ कोटी तर उपविजेत्या दिल्लीला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षी डब्ल्युपीएल २०२३ मध्येही विजेत्या मुंबई इंडियन्सलाही ६ कोटी रुपये मिळाले होते, तर दिल्ली कॅपिटल्सलाही ३ कोटी रुपये देण्यात आले होते

आरसीबीमधील विजेत्या खेळाडूंची नावे आणि मिळालेली रक्कम

  1. विजेता (६ कोटी रुपये) – रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
  2. इमर्जिंग प्लेयर (५ लाख रुपये) – श्रेयंका पाटिल (आरसीबी)
  3. ऑरेंज कैप (५ लाख रुपये) – एलिसे पैरी (आरसीबी)
  4. पर्पल कैप (५ लाख रुपये) – श्रेयंका पाटिल (आरसीबी)
  5. सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन (५ लाख रुपये) – जॉर्जिया वेयरहैम (आरसीबी)
  6. फेयर प्ले अवार्ड (५ लाख रुपये) – रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
  7. फाइनल मैच सर्वश्रेष्ठ खेळाडू (२.५ लाख रुपये) – सोफी मोलिन्यू (आरसीबी)

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.