सुनेत्रा अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार; CM Eknath Shinde यांनी दिले संकेत

Sunetra Ajit Pawar lost from Barmati CM Eknath Shinde

Eknath Shinde । माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवारांचा वाद चांगलाच पेटलाय.  शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहे. त्यांनी अजित पवारांविरोधात बारामतीत शड्डू ठोकत, हल्लाबोल केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

शिवतारे यांच्या निर्णयाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि अजित पवार ( Ajit Pawar ) गटात ठिणगी पडली आहे. विजय शिवतारे कोण, त्याचा आवाका काय, त्याची लायकी काय हे अजित पवारांना दाखवतोच असे शिवतारे म्हणाले आहेत.

बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानतंर विजय शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. भेटीनंतर शिवतारे म्हणाले की, “मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे.  मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे.”

अजित पवारांचा माज गेलेला नाही; पवार नीच, उर्मट म्हणत शिंदे गटाचा हल्लाबोल

आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. अजित पवार  (Ajit Pawar) हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे  (Vijay Shivtare) यांनी केला. आपली भूमिका एक दोन दिवसात जाहीर करू असंही ते म्हणाले.

सुनेत्रा अजित पवारांचा बारमतीतून पराभव होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे विजय शिवतारे यांच्या बोलणातून स्पष्ट होते.

अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक २०२४ सोपी जाईल असे दिसत नाही. अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहे.

आघाडी धर्म-युती धर्म या बोलायच्या गोष्टी असतात, पाळायच्या नसतात, हे या आधी राजकारण्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झालंय. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल. ही निवडणूक काटे की टक्कर सोबत एकमेकांचा काटा काढण्याची पण असणार आहे.

महत्वाच्या बातम्या