अजित पवारांनी विजय शिवतारेंना त्यांचा आवाका दाखवलाच; शिवतारे नरमल्याची चर्चा

Ajit Pawar Vs Vijay Shivtare | बारामती लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झाला होता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, तर बारामतीची जागा महायुतीच्या हातातून जाईल असा दावा विजय शिवतारेंनी केला आहे.

शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला होता. त्यांनी अजित पवारांविरोधात बारामतीत शड्डू ठोकत, हल्लाबोल केला होता. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात होते.

अजित पवारांना लायकी काय आणि अवाका किती हे दाखवणारच असे विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले होते. मात्र आता उलट घडताना चित्र पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतर विजय शिवतारे नरमले आहेत. शिवतारे यांना युतीधर्म पाळण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी विजय शिवतारेंना त्यांचा आवाका दाखवला असल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. अजित पवार  (Ajit Pawar) हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे  (Vijay Shivtare) यांनी केला होता.

अजित पवार हा अत्यंत अहंकारी माणूस आहे. नालायक माणूस आहे. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला बोललो त्यावर मी आजही ठाम आहे. माझा कायम अजित पवार या व्यक्तीला विरोध असेल, असंही विजय शिवतारे म्हणाले.

दरम्यान, अजित पवार  (Ajit Pawar) हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोललेच नसल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या