IPL 2024 । रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर हार्दिक पांड्याचे मोठे व्यक्तव्य, म्हणाला..

IPL 2024 hardik pandya comment on rohit sharma

IPL 2024 : इंडियन प्रिमीयर लीगच्या १७ व्या हंगामाची सुरुवात होण्यास ४ दिवस उरले आहेत. शुक्रवारी (२२ मार्च) सीएसके आणि आरसीबी या दोन संघांमध्ये आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.

५ वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघ सुद्धा जोरदार तयारी करत आहे. यावेळी संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे, त्यानंतर त्याने संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) याच्या कॅप्टन्सीबद्दल प्रतिक्रीया दिली आहे.

कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, “रोहित शर्मा माझ्या मदतीसाठी नेहमीच माझ्यासोबत असेल. या संघाने आत्तापर्यंत जे काही मिळवल आहे ते रोहित शर्माच्या नेतृत्वातच मिळवल आहे. आता मला फक्त हा प्रवास पुढे घेवून जायचा आहे.

IPL 2024 । hardik pandya comment on rohit sharma

पुढे हार्दिक पांड्या म्हणाला की, रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे मला मदत मिळेल. मी माझी संपुर्ण कारकिर्द रोहित शर्माच्या नेतृत्वातच घालवली आहे, त्यामुळे मला माहित आहे, त्याचा मला नेहमीच पाठिंबा राहिल.”

२०१३ साली रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला होता आणि त्याच वर्षी एमआयने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांनी आयपीएलचे ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्ससोबत नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे २४ मार्चला होणार आहे. मुंबईने रोहितच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० अशी ५ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे. त्यामुळे हार्दिकला सुद्धा मुंबईसाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी आयपीएल ट्राॅफी पटकावली होती तर दूसऱ्या वर्षी संघ उपविजेता ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.