Pune Rain | पुणेकरांनो सतर्क रहा! हवामान विभागाकडून पुण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी

Pune Rain | पुणे : आज (१५ एप्रिल) पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोबत गारांचा मारा देखील सुरूआहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुण्यात देखील तीन दिवसांपासून पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर आज काही भागात गारांचा पाऊस पडला. यामुळे पुणेकरांना सतर्क राहवं लागणार आहे. तसचं हवामान विभागाकडून पुण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस, गारपीठ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार आज पुण्यातील कोथरूड परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. गारा आणि वारे देखील वाहत आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवागन प्रशासनाने केले आहे. तसचं खडकी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी परिसरात दखील जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

पुणे शहराला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने चांगलच झोडपलं आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत होत. दिवसभर घामेघूम झालेल्या पुणेकरांन दिलासा मिळाला असला तरीही सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी ढगांच्या गडगटावेळी झाडांखाली उभे राहू नये. पाऊस पडल्यावर अपघातांची जास्त शक्यता असते यामुळे वाहने सावकाश चालवावीत. वादळ, वर असेल तेव्हा दारं, खिडक्या बंद कराव्यात अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.