Shivsena | महाराष्ट्राच्या सत्तासंषर्घाचा लढा अंतिम टप्प्यात; घटनापीठाकडून आज, उद्याची वेळ राखीव

Shivsena | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज दुसरा दिवस आहे. या सुनावणीत काल शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले.

Chief Justice’s question

आज तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील, त्यानंतर कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा युक्तिवाद करतील. सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यावर सुनावणी संपण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच आक्षेप घेतला आहे.

“तीन वर्षाचा सुखी संसार तुम्ही एका रात्रीत मोडला कसा?”

“तीन वर्षाचा सुखी संसार तुम्ही एका रात्रीत मोडला कसा?” असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला आहे. राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या कृतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यावर सुनावणी संपण्याची शक्यता आहे. तरीही, आज कामकाज पूर्ण न झाल्यास घटनापीठाने आज 15 मार्च आणि उद्या 16 मार्चची  वेळ राखीव ठेवला आहे.

“या सर्व घटना सरकार निवडून आल्यानंतर एक महिन्याने नाही तर तीन वर्षांनी झाल्या. बंडखोर आमदार तीन वर्ष राज्यपालांकडे गेले नाहीत. 3 वर्षानंतर अचानक हे लोक कसे आले? हा प्रश्न राज्यपालांनी स्वत:ला विचारायला हवा होता”, असे सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

“कोणती घटना पाहून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली?”

34 आमदारांच्या पत्राची दखल घेताना राज्यपालांनी विचार करणं गरजेचं होतं. 34 आमदार शिवसेनेचेच आहेत असं समजून त्यांच्या अंतर्गत वादाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. 34 आमदारांच्या पत्रात गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड हेच मुद्द होते. कोणती घटना पाहून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली? असा सवाल कोर्टाने तुषार मेहता यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.